December 4, 2024 11:42 AM December 4, 2024 11:42 AM

views 12

राज्यात उद्या होणार नवनिर्वाचित महायुती सरकारचा शपथविधी सोहळा

राज्यात नवनिर्वाचित महायुती सरकारचा शपथविधी सोहळा उद्या होणार आहे. मुंबईत आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्याच्या तयारीची पाहणी काल महायुतीतल्या नेत्यांनी केली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, यांच्यासह इतर केंद्रीय मंत्री, रालोआ शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

November 9, 2024 10:43 AM November 9, 2024 10:43 AM

views 14

महायुती सरकार वंचितांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याची प्रधानमंत्र्यांची धुळ्यातील सभेत ग्वाही

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांचा जोरदार प्रचार सुरू असून दिग्गज नेत्यांच्या जाहीर सभांमधून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. देशात कॉँग्रेस जाती विभाजनाचा धोकादायक खेळ खेळत असल्याची घणाघाती टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल धुळे इथल्या प्रचार सभेत केली. एनडीए सरकार आणि राज्यातील महायुती सरकार वंचितांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. त्यानंतर नाशिक इथंही पंतप्रधानांची सभा झाली. उज्ज्वला योजना, हर घर जल योजना, प...