July 2, 2024 3:38 PM July 2, 2024 3:38 PM
9
महाडच्या चवदार तळ्याच्या सुधारणेसाठी ६५ कोटींच्या प्रस्तावाला १५ दिवसात मंजुरी देण्याची मंत्री उदय सामंत यांची माहिती
राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दलच्या आभारप्रस्तावा वरच्या चर्चेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विधानसभेत उत्तर देत आहेत. महाडच्या चवदार तळ्याच्या सुधारणेसाठी ६५ कोटी रूपयांचा प्रस्ताव प्राप्त झाला असून त्याला १५ दिवसात उच्चस्तरीय समितीकडून मंजुरी देऊन, काम सुरू करू असं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिल इथलं स्मारक, चवदार तळे यांच्या विकास कामाबद्दल सरकार उदासीन असल्याचं विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार म्हणाले. नागपूर मधे दीक्षाभूमी इथल्या भूमिगत प...