February 11, 2025 10:55 AM February 11, 2025 10:55 AM

views 13

प्रयागराजसाठी पुणे विभागातून 21 फेब्रुवारीला सोडण्यात येणार विशेष रेल्वेगाडी

महाकुंभ मेळ्यानिमित्त जानेवारी महिन्यात, पुणे विभागातून 80 हजार 177 प्रवाशांनी रेल्वेने प्रयागराजपर्यंत प्रवास केला आहे. त्यामुळे रेल्वेच्या पुणे विभागाला 8 कोटी 42 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. पुणे विभागाचे विभागीय व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा आणि वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक डॉ.मिलिंद हिरवे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पुणे विभागातून आत्तापर्यंत 5 विशेष रेलगाड्या प्रयागराजसाठी सोडण्यात आल्या असून 21 फेब्रुवारीलाही विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. आयआरटीसीमार्फत प्रयागराज इथं यात्रेकर...

December 5, 2024 2:23 PM December 5, 2024 2:23 PM

views 13

प्रसार भारतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रयागराज इथल्या आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर केली चर्चा

प्रयागराजमध्ये पुढच्या वर्षी होत असलेल्या महाकुंभ मेळ्यासंबंधित विविध कार्यक्रमांबाबत काल प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी प्रयागराज इथल्या आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. या बैठकीत आकाशवाणीचे संचालक प्रज्ञा पालीवाल, दूरदर्शनचे महासंचालक कंचन प्रसाद, दूरदर्शन वृत्त चे महासंचालक कंचन प्रिया कुमार उपस्थित होते. यावेळी महाकुंभाच्या जागतिक प्रसारण आणि इतर कार्यक्रमांविषयी चर्चा झाली. हे सर्व अधिकारी आज कुंभमेळा परिसराची पाहणी करणार आहेत.