February 5, 2025 9:30 AM February 5, 2025 9:30 AM

views 8

प्रधानमंत्री मोदी आज उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं महाकुंभमेळ्याला देणार भेट

उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथ महकुंभ मेळयात आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी होणार असून, सकाळी 11 वाजता ते त्रिवेणी संगमावर पूजा आणि पवित्र स्नान करणार आहेत. यावेळी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर प्रधानमंत्री अनेक साधू संतांची भेट घेणार आहेत. तसच महकुंभमेळा परिसराची पाहणीही करणार आहेत. मागील वर्षी 13 डिसेंबर 2024 ला प्रधानमंत्री मोदी यांनी प्रयागराज इथ येऊन सुमारे साडेपाच हजार कोटी रुपयांच्या 167 विकास प्रकल्पांच उद्घाटन केल होत. दरम्यान, 13 जानेवारीपास...

January 15, 2025 10:13 AM January 15, 2025 10:13 AM

views 13

महाकुंभमेळयात मकरसंक्रांतीच्या दिवशी सुमारे साडेतीन कोटी भाविकांनी केलं पवित्र स्नान

उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथे सुरू असलेल्या महाकुंभमेळयात काल मकरसंक्रांतीच्या दिवशी त्रिवेणी संगमावर सुमारे साडेतीन कोटी भाविकांनी पवित्र स्नान केलं. या महाकुंभ मेळयात भाविकांना भाषेचा अडसर होऊ नये म्हणून ईलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 'भाषिणी'मंच उपलब्ध करून दिला आहे. यात अकरा भाषा समाविष्ट करण्यात आल्या आहेत.  

January 13, 2025 8:56 PM January 13, 2025 8:56 PM

views 4

उत्तर प्रदेशात महाकुंभ मेळ्याला सुरुवात, पहिल्याच दिवशी दीड कोटी भाविकांचं अमृत स्नान

महाकुंभ मेळ्याला आजपासून उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं पौष पौर्णिमेच्या पहिल्या अमृत स्नानानं सुरुवात झाली. या महाकुंभ मेळ्याच्या पहिल्या दिवशी स्नानासाठी आलेल्या भाविकांचं हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करुन स्वागत करण्यात आलं. २६ फेब्रुवारी रोजी येणाऱ्या महाशिवरात्री पर्यंत चालणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी लाखो भाविक जमले असून आज दीड कोटी भाविकांनी गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या पवित्र त्रिवेणी संगमावर स्नान केल्याचं वृत्त आकाशवाणीच्या वार्ताहरानं दिलं आहे.   प्रयागराजमध्ये होणारा महाकुंभ हा ज...