November 10, 2024 5:02 PM

views 16

मविआचा महाराष्ट्रनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत जाहीर

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज मुंबईत महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठीचा महाविकास आघाडीचा महाराष्ट्रनामा प्रकाशित केला. मुंबईत जाहीर केलेल्या पंचसूत्री कार्यक्रमावर आधारित हा सविस्तर जाहीरनामा प्रकाशित करत असल्याचं मल्लिकार्जुन खर्गे यावेळी म्हणाले. या महाराष्ट्रनाम्यात शेती आणि ग्रामीण विकास, उद्योग आणि रोजगार, पर्यावरणावर आधारित शहर विकास या मुद्द्यांवर आश्वासनं देण्यात आली आहेत. पंचसूत्री कार्यक्रमात प्रत्येक कुटुंबाला वर्षाकाठी ३ लाख रुपयांची मदत, महालक्ष्मी योजनेअंतर्ग...

November 9, 2024 4:25 PM

views 35

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली दीक्षाभूमीला भेट

महाराष्ट्र याआधी न्याय, कायदा आणि सुव्यवस्थेसाठी ओळखलं जात असे. मात्र महायुतीचं सरकार आल्यावर इतली प्रशासन व्यवस्था कोलमडली अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्यात बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न असून महाराष्ट्राला पुन्हा एकदा प्रगतीपथावर आणण्यासाठी ही निवडणूक आहे, असंही खर्गे म्हणाले.   महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर महालक्ष्मी योजना, कृषी समृद्धी योजना, आरोग्य विमा, मोफत प्रवास अशा लोककल्याणकारी योजना राबवू असं आश...

July 21, 2024 2:23 PM

views 20

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या

काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. खरगे यांना शुभेच्छांसाठी समाजमाध्यमावर लिहीलेल्या संदेशातून प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली आहे. काँग्रेस नेते आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही काँग्रेस खरगे यांना अध्यक्षांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल गांधी यांनीही खरगे यांच्या निरोगी आयुष्याची कामना केली आहे.