October 9, 2024 10:12 AM October 9, 2024 10:12 AM

views 17

मराठवाड्यात क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नावाने एक नवीन महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय

मराठवाड्यातल्या मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मराठवाड्यात क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नावाने एक नवीन महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या तरुणांना उद्योगासाठी २० लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा देण्यात येईल, तसंच त्यांच्या स्वयंरोजगारांसाठी विविध योजना राबवण्यात ये...

July 24, 2024 7:48 PM July 24, 2024 7:48 PM

views 24

कुणबी नोंदी न आढळलेल्या मराठा समाजातल्या कुटुंबांसाठी अधिकच्या नोंदी मिळवण्याचा राज्यसरकारचा निर्णय

कुणबी नोंदी न आढळलेल्या मराठा समाजातल्या कुटुंबांसाठी अधिकच्या नोंदी मिळवण्याचा निर्णय सरकारने घेतला असून हैदराबाद गॅझेटमधल्या नोंदी मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांचं एक पथक हैदराबादला पाठवल्याची माहिती मराठा आरक्षण मंत्री उपसमितीचे सदस्य शंभुराज देसाई यांनी दिली.   मराठा समाज आरक्षणासंबंधी शंभुराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या पथकाने तपासलेल्या कागदपत्रांची मागणी शासनाने विहीत शुल्क भरून केली आहे, या कागदपत्रांच्या सत्यप्रती तातडीने उपलब्ध करून कागदपत्रांची पडताळणी प...

July 6, 2024 7:09 PM July 6, 2024 7:09 PM

views 26

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं नाही तर राजकीय भूमिका घेण्याचा मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊन शासनानं या समाजाबद्दलची आस्था दाखवून द्यावी अन्यथा आगामी काळात राजकीय भूमिका घेऊ, असा इशारा आज आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दिला. हिंगोली शहरात मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीच्या वेळी ते बोलत होते. यावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ही रॅली सुरू झाली.  यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त होता.