October 15, 2024 11:16 AM October 15, 2024 11:16 AM

views 17

मराठवाड्यातला दुष्काळ दूर करण्यासाठी ८० हजार कोटीचा प्रकल्प राबवणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

मराठवाड्यातला दुष्काळ दूर करण्यासाठी ८० हजार कोटीचा प्रकल्प राबवणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातल्या कुंभारपिंपळगाव इथं आयोजित शेतकरी मेळाव्यात ते काल बोलत होते. मराठवाड्यामध्ये जे आवश्यक आहे, त्या बाबी करून नदीजोड प्रकल्पच्या माध्यमातून समुद्रात वाया जाणारं पाणी वळवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. याबरोबरच सरकार राज्यातल्या शेतकऱ्यांना कधीच वाऱ्यावर सोडणार नाही, शेतकऱ्यांना १२ हजार रुपये देणारं महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार, हे देशातल...

September 6, 2024 9:05 AM September 6, 2024 9:05 AM

views 24

कोकणातलं अतिरिक्त पाणी मराठवाड्यात वळवण्यासाठीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता

कोकणातील अतिरिक्त पाणी मराठवाड्यात वळवण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. कोकण खोऱ्यातून एकूण ५४ पूर्णांक ७० टीएमसी अतिरिक्त पाणी मराठवाड्यासाठी वळवणं शक्य असून, याकरता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी ६१ कोटी ५२ लाख रुपये किमतीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे मराठवाड्यात सुमारे दोन लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रास सिंचन, पेयजल तसंच औद्योगिक वापरासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.

July 3, 2024 7:07 PM July 3, 2024 7:07 PM

views 22

येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता

येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याच काळात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.

June 23, 2024 11:22 AM June 23, 2024 11:22 AM

views 11

कोकण, मध्य-महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वीजांसह मुसळधार पावसाचा इशारा

कोकण, मध्य-महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी वीजांसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. कोकण किनारपट्टीवर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी आणि जोराचे वारे वाहण्याचा अंदाज आहे तसंच विदर्भातही जोराच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्याला पिवळा बावटा तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला नारिंगी बावटा जारी करण्यात आला आहे.