January 15, 2025 3:58 PM January 15, 2025 3:58 PM

views 11

येत्या रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमातून प्रधानमंत्री देशवासीयांशी साधणार संवाद

येत्या रविवारी १९ तारखेला आकाशवाणीवर 'मन की बात' कार्यक्रमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ११८वा भाग असेल. त्यासाठी आपल्या सूचना आणि कल्पना पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 1800-11-7800 या टोल फ्री क्रमांकाबरोबर मायजीओव्ही आणि नमो ॲपवरुनही संपर्क साधता येईल.

October 3, 2024 8:25 PM October 3, 2024 8:25 PM

views 29

मन की बात या विशेष कार्यक्रमाला आज १० वर्ष पूर्ण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा रेडिओच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्याच्या मन की बात हा विशेष कार्यक्रम सुरु झाल्याला आज १० वर्ष पूर्ण झाली. प्रधानमंत्र्यांनी २०१४ मध्ये आजच्या दिवशी पहिल्यांदा या कार्यक्रमातून जनतेशी थेट संवाद साधला होता. आजवर या कार्यक्रमाच्या विविध भागात प्रधानमंत्र्यांनी सर्वसामान्य माणसाचं जीवन प्रभावित करणाऱ्या सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण विषयक मुद्द्यांवर चर्चा केली आहे. मन की बात हा कार्यक्रम प्रधानमंत्र्यांशी संवाद साधण्याचं जनतेचं एक महत्वपूर्ण माध्यम बनला आहे.

September 29, 2024 10:18 AM September 29, 2024 10:18 AM

views 15

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता आकाशवाणीवर ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशविदेशातल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ११४ वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, newsonair हे संकेतस्थळ तसंच न्यूज ऑन एआयआर या ॲपवर प्रसारित केला जाईल.

August 24, 2024 7:20 PM August 24, 2024 7:20 PM

views 13

मन की बात या कार्यक्रमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या देशवासियांशी संवाद साधणार

  आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी अकरा वाजता देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ११३ वा भाग आहे.  हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून आणि दूरदर्शन वाहिनीवरून प्रसारित होईल. newsonair.gov.in हे संकेतस्थळ तसंच न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍपवरही हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे यूट्यूब चॅनल, प्रधानमंत्री कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनलवर या कार्यक्रमाचं थेट प्रसारण केलं जाणार आ...

July 1, 2024 1:20 PM July 1, 2024 1:20 PM

views 15

लोकसभा निवडणुकीत देशातल्या मतदारांनी संविधान आणि लोकशाही व्यवस्थेवरच्या अढळ विश्वासाचं दर्शन घडवलं – प्रधानमंत्री

लोकसभा निवडणुकीत देशातल्या मतदारांनी संविधान आणि लोकशाही व्यवस्थेवरच्या अढळ विश्वासाचं दर्शन घडवल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या एकशे अकराव्या भागात ते काल बोलत होते. जगातली सर्वात मोठी सार्वत्रिक निवडणूक यशस्वीपणे पार पडल्याबद्दल त्यांनी निवडणूक यंत्रणा आणि मतदारांचं अभिनंदन केलं तसंच देशवासीयांचे आभार मानले. जगभरात भारतीय संस्कृती गौरवली जात असल्याचं सांगताना त्याबाबतची अनेक उदाहरणं प्रधानमंत्र्यांनी मन की बात या कार्यक्रमात दिली. दह...

June 27, 2024 7:56 PM June 27, 2024 7:56 PM

views 10

प्रधानमंत्री येत्या रविवारी मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरुन मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधत आहेत. हा या कार्यक्रमाचा १११ वा, तर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाल्यानंतरचा पहिलाच भाग असेल. रविवारी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम सुरु होईल. आकाशवाणी आणि दूरदर्शनची सर्व केंद्र, एआयआर न्यूज हे संकेत स्थळ, आणि न्यूजऑनएआयआर या मोबाईल ॲपवरही हा कार्यक्रम ऐकता येईल. आकाशवाणी वृत्तविभाग, डीडीन्यूज, प्रधानमंत्री कार्यालय, तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनल्सवरही हा कार्यक्रम उपलब...