June 27, 2024 8:07 PM June 27, 2024 8:07 PM

views 32

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ

झारखंडमधल्या रांची विशेष पीएमएलए न्यायालयानं माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ केली आहे. जमीन घोटाळा प्रकरणी मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सोरेन यांच्यासह अन्य ११ आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर पुढील सुनावणी ११ जुलै रोजी होणार आहे.