August 16, 2025 3:34 PM August 16, 2025 3:34 PM

views 1

देशभरात जन्माष्टमीचा उत्साह

राज्यात गोकुळाष्टमीचा सण उत्साहात साजरा होत आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यात विविध ठिकाणी दहीहंड्याचं आयोजन करण्यात आलं आहे. दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये ही उत्साह असून गेल्या दोन महिन्यांपासून सराव केलेली दहीहंडी पथकं मानवी मनोरे रचत आहेत.  ठाण्यात प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित संस्कृती दहीहंडी मध्ये १० थर रचत कोक...