October 1, 2024 8:31 PM

views 30

जम्मूकाश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मतदान

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकांच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातल्या मतदानाला आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ६५ पूर्णांक ४८ शतांश टक्के मतदान झालं. तिसऱ्या टप्प्यात ४० विधानसभा मतदारसंघ असून त्यापैकी २४ जम्मू विभागात तर १६ काश्मीरमध्ये आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या टप्प्यात सर्वाधिक ७२ पूर्णांक ९१ शतांश टक्के मतदान उधमपूरमध्ये झालं आहे.    जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी १८ सप्टेंबरला पहिल्या तर  २५ सप्टेंबरला दुसऱ्या टप्प्यात मतदान झालं. पहिल्या टप्प्यात...