February 5, 2025 4:13 PM February 5, 2025 4:13 PM
35
दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदान सुरू
दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी आज मतदान होत असून दुपारी १ वाजेपर्यंत एकूण ३३ पूर्णांक ३१ शतांश टक्के मतदान झालं आहे. सकाळी सात ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण ६९९ उमेदवार रिंगणात असून १ कोटी ५६ लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी चोख बंदोबस्त करण्यात आला असून, निवडणूक आयोगानं १ लाख ८० हजारापेक्षा जास्त कर्मचारी तैनात केले आहेत. या निवडणुकीत अनेक प्रमुख नेत्यांचं राजकीय भवितव्य निश्चित होणार आहे. यात आम आदमी...