July 21, 2024 2:17 PM July 21, 2024 2:17 PM

views 10

मणिपूरमधे सुरक्षा कारवाईत मोठ्या प्रमाणात शस्त्रात्र आणि स्फोटकं जप्त

मणिपूरमधे सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात शस्त्रात्र आणि स्फोटकं जप्त करण्यात आली. इंफाळ आणि चुराचांदपूर जिल्ह्यांमधे हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. या शोधमोहिमेदरम्यान राज्यात २९६ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून चौकशी सुरु केली आहे. राष्ट्रीय महामार्गांवर बंदोबस्तात वाढ करुन वाहतूक सुरक्षित होईल, याची काळजी घेतली आहे डोंगराळ भागात आण खोऱ्यात मिळून ११६ तपासणी नाके सुरु करण्यात आले आहेत.

July 8, 2024 8:00 PM July 8, 2024 8:00 PM

views 6

राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज एक दिवसीय मणिपूर दौरा केला. यावेळी त्यांनी आसामच्या कचार इथल्या पूरग्रस्त कुटुंबांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी जिरीबाम जिल्ह्यात आश्रयाला आलेल्या हिंसाचारग्रस्त कुटुंबांशी संवाद साधला. इन्फाळला भेट दिल्यानंतर राहुल गांधी चुराचांदपूरकडे   रवाना झाले. तिथे मदत केंद्रांना भेट दिल्यावर  ते बिष्णुपूर जिल्ह्यातल्या मदत केंद्रातल्या कुटुंबांशी संवाद साधतील. दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात ते मणिपूरच्या राज्यपाल अनुसुया उईके यांची भेट घेणार आहेत.

July 4, 2024 2:43 PM July 4, 2024 2:43 PM

views 7

राज्यसभेचं कामकाज संस्थगित

मणिपूरमधली परिस्थिती निवळण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत असल्याचा पुनरुच्चार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाबद्द्ल आभार प्रस्तावाला राज्यसभेत उत्तर देताना “मणिपूरमध्ये शांतता आणि सौहार्द सुनिश्चित करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सर्व संबंधितांशी चर्चा करत असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. मणिपूरमध्ये राहून स्वतः गृहमंत्र्यांनी शांततेसाठीच्या वाटाघाटी घडवून आणल्या. मणिपूरमधे हिंसाचाराच्या घटना सातत्याने कमी होत असल्याचं सत्य आपण मान्य केलं ...

June 15, 2024 8:35 PM June 15, 2024 8:35 PM

views 19

मणिपूरमधील बोरोबेकरा भागात शांतता राखण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अतिरिक्त जवान तैनात

मणिपूरमधील जिरीबाम जिल्ह्यातल्या बोरोबेकरा उपविभागाअंतर्गतच्या भागात शांतता राखण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अतिरिक्त जवान तैनात केले गेले आहेत. ६ मे पासून इथे पुन्हा सुरू झालेल्या हिंसाचाराचा या क्षेत्रात मोठा प्रभाव दिसून आल्यानं अतिरिक्त जवान तैनात केल्याचं प्रशासनानं कळवलं आहे. जिल्हा प्रशासनानं आज मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतलेल्या कुटुंबांना स्वयंपाकाचा गॅस सिलिंडरसह इतर आवश्यक वस्तूंचं वाटप केलं. यासोबतच आरोग्य कर्मचाऱ्यांद्वारेही अविरत सेवा पुरवली जात आहे. जिल्हा मुख्यालयात आश्रय घे...