August 27, 2024 8:40 AM

views 21

राज्यभरातल्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी पॅनिक बटण बसवले जाणार

राज्यभरातल्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी पॅनिक बटणं बसवण्याचा उपक्रम राबवला जाणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज मुंबईत बातमीदारांना ही माहिती दिली. शाळांमध्ये तक्रारपेट्या बसवण्याचं काम तातडीनं पूर्ण करणार असून पोलिसांच्या उपस्थितीत या पेट्या उघडण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं काल घेतल्याचं त्यांनी सांगितलं.  दरम्यान, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या आरोपीची रवानगी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.