September 21, 2025 9:23 AM September 21, 2025 9:23 AM

views 20

सातारा, सांगली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातल्या अतीवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईला मंजुरी

सातारा, सांगली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यात जून ते ऑगस्ट दरम्यान अतीवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकंदर ६८९ कोटी रुपयांपेक्षा अधिक भरपाई देण्याला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी केल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.