April 17, 2025 2:32 PM April 17, 2025 2:32 PM

views 18

यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर

यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर झाला आहे. आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष पद्मविभूषण बिर्ला यांचं दूरदर्शी नेतृत्व आणि भारताच्या विकासगाथेत त्यांनी दिलेल्या योगदानासाठी हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८३ व्या स्मृतिदिनी मुंबईत येत्या २४ एप्रिलला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल. गुरु दीनानाथजींच्या समर्पण, उत्कृष्टता आणि सेवेच्या भावनेला मूर्त रूप देणाऱ्...