August 24, 2024 2:21 PM

views 18

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉईड ऑस्टीन यांची भेट घेतली

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिकेत वॉशिंग्टन डीसी इथं अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉईड ऑस्टीन यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये संरक्षण सहकार्य, उद्योग, प्रादेशिक सुरक्षा आणि इतर आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा झाली. या चर्चेदरम्यान, राजनाथ सिंह यांनी दोन्ही देशांदरम्यानच्या विकासाच्या संधींवर भर दिला. दोन्ही देशांदरम्यान झालेल्या S.O.S.A अर्थात सुरक्षा पुरवठा व्यवस्थेबद्दल लॉईड आणि राजनाथ सिंह यांनी समाधान व्यक्त केलं.

August 10, 2024 2:20 PM

views 23

भारत आणि तिमोर लेस्‍ते हे दोन्ही देश मैत्री आणि लोकशाहीविषयी वचनबद्ध आहे-राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

भारत आणि तिमोर लेस्‍ते हे दोन्ही देश मैत्री आणि लोकशाहीविषयी वचनबद्ध असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. तिमोर लेस्‍तेची राजधानी डिली इथं आयोजित कार्यक्रमात त्या संबोधित करत होत्या. तिमोर लेस्‍तेच्या सर्वोच्च नेत्यांशी आज राष्ट्रपतींनी द्विपक्षीय चर्चा केली असून भारतीय समुदायाशीही संवाद साधला.