July 21, 2024 2:28 PM July 21, 2024 2:28 PM

views 14

केदारनाथ पायी मार्गावर दरड कोसळल्यामुळे ३ भाविकांचा मृत्यू

केदारनाथ पायी मार्गावर दरड कोसळल्यामुळे ३ भाविकांचा मृत्यू झाला तर ५ भाविक जखमी झाले आहेत. केदारनाथ यात्रा मार्गावर चिरबासाजवळच्या डोंगरावरून मोठे दगड आल्यानं काही यात्रेकरू ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी दिली. एनडीआरएफ, डीडीआर, वायएमएफचे पथकाकडून बचावकार्य सुरू आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी या दुर्घटनेत झालेल्या मृत्यूबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. आपण अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असल्याचं ते म्हणाले.

July 2, 2024 8:13 PM July 2, 2024 8:13 PM

views 14

ब्राझीलच्या रिओ ग्रांदे डो सुल राज्यात पूर आणि भूस्खलनामुळे किमान १७९ लोकांचा मृत्यू

ब्राझीलच्या दक्षिणेकडील रिओ ग्रांदे डो सुल राज्यात पूर आणि भूस्खलनामुळे किमान १७९ लोक मरण पावले आणि ३३ लोक अद्याप बेपत्ता आहेत. राज्याच्या नागरी संरक्षण संस्थेनं ही माहिती दिली. गेल्या दोन महिन्यांत, विपरित हवामानामुळे २ पूर्णांक ३९ दशलक्षाहून अधिक रहिवासी प्रभावित झाले आणि ४ लाख ५० हजारांहून अधिक लोकांना स्थलांतरित करावं लागलं असल्याचं संस्थेच्या अहवालात म्हटलं आहे.