September 26, 2024 3:18 PM September 26, 2024 3:18 PM
11
महाराष्ट्रात मुंबई, ठाण्यासह राज्यभरात पावसाचं थैमान
मुंबईसह अनेक ठिकाणी काल मुसळधार पावसाने थैमान घातलं. मुंबईतले अनेक रस्ते जलमय झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. पाऊस आणि वादळामुळे विमानतळावरची १६ उड्डाणं वळवण्यात आली. तसंच, अनेक रेल्वेगाड्याही थांबवाव्या लागल्या. मुसळधार पावसामुळे मुंबईसह, ठाणे, पालघर जिल्ह्यातल्या सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर झाली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ६ जणांचा मृत्यू झाला असून २ जण जखमी तर ३ जण बेपत्ता आहेत. मुंबईत अंधेरीत पर्जन्य जलवाहिनीत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला असून या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश म...