October 9, 2024 10:06 AM October 9, 2024 10:06 AM

views 15

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भीमा उजनी प्रकल्पा अंतर्गत देगाव शाखा कालव्याच्या कामांचं भूमिपूजन

भीमा उजनी प्रकल्पा अंतर्गत देगाव शाखा कालव्याच्या कामांचं भूमिपूजन काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. या कामासाठी 352 कोटी रुपये खर्च येणार असून याचा लाभ दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या दहा गावे आणि अक्कलकोट तालुक्यातल्या 25 गावांना होणार आहे. या प्रकल्पामुळे 16 हजार 129 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊन या भागातल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार असल्याचं समाधान फडणवीस यांनी व्यक्त केलं.