December 4, 2024 10:44 AM December 4, 2024 10:44 AM
17
क्वांटम तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी भारताने इस्रायलला भागीदारीसाठी केले आमंत्रित
क्वांटम तंत्रज्ञानाचा विकास करण्याच्या उद्देशानं भारतातील उद्योगांशी इस्त्रायलमधील स्टार्टअप्सनी भागीदारी करावी यासाठी भारतानं पुढाकार घेतला आहे. इस्त्रायलचे उद्योग आणि आर्थिक विभागाचे मंत्री नीर बरकत सध्या भारताच्या दौऱ्यावर असून काल त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांची भेट घेतली. बैठकीत, स्टार्टअपमधील सहकार्य, तसंच अंतराळ आणि क्वांटम तंत्रज्ञान, कृषी आणि आरोग्य क्षेत्रातील नावीन्यपूर्ण उपक्रमांसंदर्भातील सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला. तसंच सेमीकंडक्टर्स, कृत्रिम बुध्दी...