June 17, 2024 11:13 AM June 17, 2024 11:13 AM

views 20

भारत आणि कंबोडिया थेट विमानसेवा सुरू

  भारत आणि कंबोडिया यांच्यात कालपासून थेट विमानसेवा सुरू झाली. कंबोडियाचे उपपंतप्रधान नेथ सेवोउन आणि तिथल्या भारतीय राजदूत देवयानी खोब्रागडे यांच्या हस्ते काल या विमानसेवेचं अधिकृत उद्घाटन झालं. या विमानसेवेद्वारे पहिल्या पर्यटन वर्षाची सुरुवात झाली असून यामुळे पर्यटनाला तसंच नागरिकांचा परस्पर संवाद वाढण्याला चालना मिळेल असं भारतीय वकीलातीनं समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.