February 6, 2025 11:43 AM

views 17

भारत आणि इंग्लंड यांच्यात आज खेळला जाणार तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना

भारत आणि इंग्लंड यांच्यातला तीन 50 षटकांच्या सामन्यांच्या मालिकेतला पहिला क्रिकेट सामना आज नागपूरमधल्या विदर्भ क्रिकेट संघटनेच्या मैदानावर खेळवला जाईल. हा सामना दुपारी दीड वाजता सुरू होईल.या मालिकेतला दुसरा सामना येत्या रविवारी ओडिशामधल्या कटकमध्ये तर तिसरा आणि शेवटचा 50 षटकांचा सामना 12 फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये होणार आहे.