July 21, 2024 1:07 PM July 21, 2024 1:07 PM

views 7

परदेशी गुंतवणुकदारांचा भारतीय शेअर बाजारात गुंतवणुकीचा वेग कायम

परदेशी गुंतवणुकदारांनी भारतीय शेअर बाजारात ,गुंतवणुकीचा वेग कायम ठेवल्याने या महिन्यात आत्तापर्यंत रोखे आणि कर्जामध्ये 44344 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. देशातल्या डिपॉझिटरीजनी दिलेल्या आकडेवारीनुसार, विदेशी गुंतवणुकदारांनी 30 हजार 771 कोटी रुपये रोखे आणि 13573 कोटी रुपये कर्जात गुंतवले आहेत. वाहन उद्योग, भांडवली वस्तू, आरोग्य सेवा, माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार तसेच तेल वायू क्षेत्रामध्ये या खरेदीदारांनी गुंतवणूक केली आहे. चालू आर्थिक वर्षात रोखे आणि कर्ज या दोन्हींमध्ये दोन लाख 82 हजार 338 क...

July 6, 2024 6:16 PM July 6, 2024 6:16 PM

views 5

जून २०२४ मध्ये उघडली ४२ लाखांहून अधिक नवीन डी मॅट खाती

भारतीय शेअर बाजार नवे उच्चांक गाठत असल्याच्या पार्श्वभूमीवर जून २०२४ मध्ये ४२ लाखांहून अधिक नवीन डी मॅट खाती उघडली आहेत. केंद्रीय डिपॉझिटरी सर्व्हिस आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी यांनी ही माहिती दिली आहे. यामुळे, डी मॅट खात्यांची एकूण संख्या आता १६ कोटीवर पोहोचली आहे. एका महिन्यात ४० लाखांहून अधिक नवीन डी मॅट खाती उघडण्याची ही चौथी वेळ आहे. गेल्या गुरुवारी मुंबई शेअर बाजार तसंच राष्ट्रीय शेअर बाजाराचा  निर्देशांक आतापर्यंतच्या सर्वाधिक उंचीवर पोहोचला होता.