April 9, 2025 3:18 PM

views 25

गुजरातमधे आज होत आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन आज गुजरातमधे साबरमती नदीच्या काठावर होत आहे. तिरस्कार, नकारात्मकता आणि निराशेचं वातावरण बदलून न्याय आणि संघर्षाच्या मार्गाने जाण्याचा निर्धार महासचिव सचिन पायलट यांनी व्यक्त केला. महात्मा गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपद स्वीकरल्याला १०० वर्षं पूर्ण होत असून सरदार वल्लभभाई पटेल यांचं शतकोत्तर सुवर्णजयंती वर्ष असल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक काल गुजरातमध्ये अहमदाबाद इथं झाली.  

January 15, 2025 2:20 PM

views 10

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नवीन मुख्यालयाचं आज नवी दिल्लीत झालं उद्घाटन

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नवीन मुख्यालयाचं उद्घाटन आज नवी दिल्लीत झालं. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, आणि काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी या इंदिरा भवनचं उद्घाटन केलं. लोकसभेतले विरोधी पक्ष नेता राहुल गांधी आणि इतर ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते.