December 4, 2024 10:55 AM

views 14

भारतीय जनता पक्षाच्या गटनेत्याची निवड करण्यासाठी नवनियुक्त आमदारांची आज मुंबईत बैठक

भारतीय जनता पक्षाच्या गटनेत्याची निवड करण्यासाठी नवनियुक्त आमदारांची आज मुंबईत बैठक होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी निरिक्षक म्हणून या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी उद्या मुंबईतील आझाद मैदान इथं संध्याकाळी 5 वाजता पार पडेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, अन्य केंद्रीय मंत्री तसंच रालोआ शासित राज्यांचे मुख्यमंत्री या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.  

July 21, 2024 6:50 PM

views 24

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार येईल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार येईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते आज पुण्यात भारतीय जनता पक्षाच्या महाअधिवेशनात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते.   लोकसभा निवडणुकीच्या वेळी विरोधी पक्षांनी संविधान, महागाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत भाजपावर आरोप करताना खोटा प्रचार केला, तो पक्षनेते आणि कार्यकर्त्यांनी हा प्रचार खोडून काढला पाहीजे असं ते म्हणाले. मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याबात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी आपली ...