June 13, 2024 8:22 PM June 13, 2024 8:22 PM
67
कुवेत : इमारतीला लागलेल्या आगीत ४५ भारतीय कामगारांचा मृत्यू
कुवेतच्या मानगाफ परिसरातल्या इमारतीला काल लागलेल्या आगीत ४५ भारतीय कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये केरळच्या २४ कामगारांचा समावेश आहे. या अपघातातल्या मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये तसंच जखमींना एक लाख रुपये देण्य़ाची घोषणा केरळ सरकारनं आज केली आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री किर्ती वर्धन सिंग यांनी आज कुवेतमध्ये जखमींची भेट घेतली.