September 6, 2025 3:09 PM September 6, 2025 3:09 PM

views 8

अत्यावश्यक खनिजांच्या देशांतर्गत क्षमता निर्मितीवर भारताचं लक्ष केंद्रित

पुरवठा साखळीतली लवचिकता अधिक बळकट करण्यासाठी भारतानं अत्यावश्यक खनिजांच्या देशांतर्गत क्षमता निर्मितीवर लक्ष केंद्रित केलं आहे. देशात अत्यावश्यक खनिज पुनर्वापराला चालना देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं नुकतीच पंधराशे कोटी रुपयांच्या प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिली आहे. या उपक्रमामुळे  किमान २७० किलो टन वार्षिक पुनर्वापर क्षमता विकसित होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे सुमारे ४० किलो टन वार्षिक महत्त्वपूर्ण खनिज उत्पादन होईल, त्याचबरोबर सुमारे ८ हजार कोटी रुपये गुंतवणूक  तसंच जवळपास ७० हजार प्रत्यक्ष...

April 1, 2025 2:46 PM April 1, 2025 2:46 PM

views 34

‘ऑपरेशन ब्रह्म’ अंतर्गत भारताने म्यानमारला पाठवली मदत

म्यानमारमधल्या विनाशकारी भूकंपासाठी मदत म्हणून भारताने सुरु केलेल्या ‘ऑपरेशन ब्रह्म’ अंतर्गत १६ टन अत्यावश्यक मदत सामुग्री, तांदूळ आणि खाद्यपदार्थ घेऊन वायुसेनेच एक विमान मंडालेकडे निघालं आहे. नौसेनेचे जहाज आय एन एस घडियाल देखील ४४२ मेट्रिक टन मदतसामुग्री घेऊन विशाखापट्टणम इथून निघालं आहे. मंडाले इथं भारतीय लष्कराचं वैद्यकीय मदत केंद्र कार्यरत झालं आहे. परराष्ट्रमंत्री डॉ जयशंकर यांनी आज वार्ताहरांना ही माहिती दिली. म्यान्मांमधल्या भारतीय दूतावासाने तिथल्या सरकारी अधिकाऱ्यांशी समन्वय साधून मदतका...

February 11, 2025 10:30 AM February 11, 2025 10:30 AM

views 5

भारत आणि इंग्लंड दरम्यान चौथा ऊर्जा संवाद संपन्न

भारत आणि इंग्लंड दरम्यान चौथा ऊर्जा संवाद काल ऊर्जा मंत्री मनोहर लाल आणि इंग्लंडचे समपदस्थ एड मिलीबंद यांच्यात पार पडला. उभय देशांच्या ऊर्जा क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा आढावा यात घेण्यात आला. त्यामध्ये वीज आणि अक्षय ऊर्जा यांचाही समावेश होता.

February 7, 2025 1:36 PM February 7, 2025 1:36 PM

views 22

चीनमध्ये आजपासून सुरू होणाऱ्या आशियाई हिवाळी क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या ५९ खेळाडूंचा सहभाग

चीनमध्ये आजपासून येत्या १४ फेब्रुवारी पर्यंत नवव्या आशियाई हिवाळी क्रीडास्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेतल्या भारतीय तुकडीत ८८ जणांचा समावेश आहे. यात ५९ खेळाडू आणि २९ संघ अधिकारी आहेत. यंदा प्रथमच, अल्पाइन स्कीइंग, क्रॉस-कंट्री स्कीइंग, फिगर स्केटिंग, शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग आणि लाँग ट्रॅक स्पीड स्केटिंग या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा महासंघ संपूर्ण अर्थसहाय्य देणार आहे.

February 4, 2025 2:14 PM February 4, 2025 2:14 PM

views 26

संयुक्त राष्ट्रसंघाच्या वार्षिक खर्चासाठी भारताचं ३ कोटी ७६ लाख ४० हजार अमेरिकन डॉलर्सचं योगदान

संयुक्त राष्ट्रसंघाच्या वार्षिक खर्चासाठी भारतानं ३ कोटी ७६ लाख ४० हजार अमेरिकन डॉलर्सचं योगदान दिलं आहे. नियमित पणे योगदान देणाऱ्या ३५ देशांमध्ये भारताची गणना होते.संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासचिवांचे प्रवक्ते स्टीफन दुजारीक यांनी कालच्या वार्ताहर परिषदेत भारताच्या नियमितपणाची प्रशंसा केली आहे.  

January 22, 2025 11:06 AM January 22, 2025 11:06 AM

views 18

जागतिक बँकेने नियुक्त केलेल्या तटस्थ तज्ज्ञाने सिंधू पाणी कराराच्या संदर्भात भारताच्या भूमिकेचे केले समर्थन

जम्मू आणि काश्मीरमधील दोन जलविद्युत प्रकल्पांवर भारत आणि पाकिस्तानमध्ये असलेल्या मतभेदांवर सिंधू पाणी करारांतर्गत निर्णय घेण्यास सक्षम असल्याचं जागतिक बँकेने नियुक्त केलेल्या तटस्थ तज्ज्ञाने जाहीर केलं आहे. या तज्ज्ञाने प्रकल्पांच्या आरेखनाविषयी असलेली चिंता विचारात घेण्यासाठी लवाद नेमण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळून लावली आहे. किशनगंगा आणि रॅटले जलविद्युत प्रकल्पांवरील चिंता विचारात घेण्यासाठी तटस्थ तज्ज्ञाची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. तटस्थ तज्ज्ञाने जाहीर केलेल्या निवेदनात, काळजीपूर्...

January 16, 2025 10:45 AM January 16, 2025 10:45 AM

views 11

अमेरिकेने निर्यात नियंत्रण यादीतून भारताच्या तीन आण्विक संस्थांवरचे उठवले निर्बंध

अमेरिकेनं भारताच्या भाभा अणुसंशोधन केंद्र, भारतीय दुर्मीळ पृथ्वीविज्ञान केंद्र आणि इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र या तीन संस्थांवरचे निर्बंध उठवले आहेत. अमेरिकेच्या उद्योग आणि सुरक्षा विभागानं ही घोषणा केली. शीतयुद्धाच्या काळात लादण्यात आलेले हे निर्बंध अमेरिकेच्या परदेशी धोरण उद्दिष्टांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीनं हटवण्यात आल्याचं या विभागानं म्हटलं आहे. हे निर्बंध उठवल्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातल्या विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयक संयुक्त प्रयत्नांना बळ मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्या...

January 13, 2025 10:43 AM January 13, 2025 10:43 AM

views 24

महिला क्रिकेट्च्या दुसऱ्या सामन्यात भारताचा आयर्लंडवर 116 धावांनी विजय

महिला क्रिकेटमध्ये राजकोट इथं झालेल्या मर्यादित षटकांच्या दुसऱ्या सामन्यात काल भारतानं आयर्लंडवर 116 धावांनी विजय मिळवला. आणि या तीन सामन्यांच्या या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. काल नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 50 षटकात 5 खेळाडूंच्या मोबदल्यात 370 धावा केल्या. जेमिमा रॉड्रिग्जनं शतकी खेळी केली. हरलीन देओल, स्मृती मंधना, प्रतिका रावल यांनीही चमकदार खेळी करत भारताच्या धावसंख्येत मोठी भर टाकली. 371 धावांचं हे मोठं लक्ष्य गाठताना आयर्लंडला 254 धावांच करता आल्या. या माल...

December 8, 2024 2:05 PM December 8, 2024 2:05 PM

views 17

ब्रिस्बेन येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघांमध्ये आज ब्रिस्बेन इथं झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतावर १२२ धावांनी विजय मिळवला. या विजयासोबत ऑस्ट्रिलेयानं तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर जॉर्जिया आणि एलिसे यांच्या शतकी खेळींच्या जोरावर निर्धारीत ५० षटकांत ८ बाद ३७१ धावा केल्या. विजयासाठी ३७२ धावांचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ ४४ षटकं आणि ५ चेंडूंमध्ये २४९ धावा करू...

December 7, 2024 2:07 PM December 7, 2024 2:07 PM

views 13

संयुक्त राष्ट्संघाच्या अंमली पदार्थ नियंत्रण आयोगाच्या ६८ व्या सत्राचं अध्यक्षपद भारत भूषवणार

संयुक्त राष्ट्संघाच्या अंमली पदार्थ नियंत्रण आयोगाच्या ६८ व्या सत्राचं अध्यक्षपद भारत भूषवणार आहे. ऑस्ट्रियाची राजधानी विएना इथं संयुक्त राष्ट्रसंघाचे भारताचे स्थायी प्रतिनिधी शंभु कुमारन यांनी काल आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्विकारला. भारताला पहिल्यांदाच या आयोगाच्या अध्यक्षपदी निवडण्यात आलं आहे. हा आयोग जागतिक स्तरावर अंमली पदार्थांविषयी प्रकरणांवर लक्ष ठेऊन त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीनं सदस्य राष्ट्रांना धोरण ठरवण्यासाठी मदत करत असतो.