October 29, 2024 9:41 AM October 29, 2024 9:41 AM
11
भाजपाचा आपल्या कोट्यातल्या ४ जागा मित्रपक्षांना द्यायचा निर्णय
भाजपानं त्यांच्या कोट्यातल्या ४ जागा मित्रपक्षांना द्यायचा निर्णय घेतला आहे. त्यात बडनेराची जागा युवा स्वाभिमान पार्टी, गंगाखेडची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला, कलिनाची जागा रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टीला आणि शाहुवाडीची जागा जनसुराज्य शक्ती पक्षाला दिली आहे. यासंदर्भातलं पत्रक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी प्रसिद्ध केलंय. दरम्यान, रिपब्लिकन पक्षाला शिवसेनेच्या कोट्यातून धारावी आणि भाजपाच्या कोट्यातून कालिना हे दोन मतदार संघ दिल्याचा दावा रामदास आठवले यांनी केला आहे. मु...