January 22, 2025 10:55 AM

views 26

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा भाग म्हणून प्रधानमंत्री आज भाजपच्या मतदान केंद्र कार्यकर्त्यांशी साधणार संवाद

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा भाग म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज भाजपाच्या मतदान केंद्र कार्यकर्त्यांशी नमो अॅप्लिकेशनद्वारे संवाद साधणार आहेत. “मेरा बूथ सबसे मजबूत” हे या उपक्रमाचं घोषवाक्य आहे. या उपक्रमाअंतर्गत, दिल्लीतील 256 प्रभागांतील, 13 हजार 33 पक्षाचे खासदार, आमदार, मतदान केंद्रांवरील पक्ष कार्यकर्ते दृक-श्राव्य माध्यमातून प्रधानमंत्र्यांचा संदेश ऐकतील. त्यांपैकी काही कार्यकर्त्यांना प्रधानमंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी मिळणार असल्याचं नमो अॅपचे राष्ट्रीय समन्वयक कुलजीत ...

January 22, 2025 9:58 AM

छत्रपती संभाजीनगर इथले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

छत्रपती संभाजीनगर इथले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांनी अनेक पदाधिकारी तसंच शिवसैनिकांसोबत काल भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्ष कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला. मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.  

November 10, 2024 5:02 PM

views 20

भाजपाचं संकल्पपत्र अमित शाह यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध

भारतीय जनता पार्टीचा निवडणूक जाहीरनामा शेतकऱ्यांचा सन्मान, आणि गरीबांची सेवा करणारा, युवकांना रोजगाराच्या नव्या संधी देणारा आणि महिलांचं सक्षमीकरण करणारा असा असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत भाजपाचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर बोलत होते. लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम दीड हजार रुपयांवरून एकवीसशे रुपये करणार, महिला सुरक्षेसाठी २५ हजार महिलांचा पोलिस दलात समावेश केला जाणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी, २५ लाख रोजगारांची निर्मिती, अशी अनेक आश्वासनं य...

November 10, 2024 8:42 AM

views 13

भाजप तसेच महाविकास आघाडीचा जाहीरनामा आज होणार प्रसिद्ध

भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईत निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत. त्यांच्या आज जळगाव, बुलडाणा आणि अमरावती याठिकाणी प्रचारसभा देखील होणार आहेत. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे देखील आज मुंबईत महाविकास आघाडीचं घोषणापत्र जारी करणार आहेत. काँग्रेसचे सचिव के सी वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय राऊत यावेळी उपस्थित असतील.

July 24, 2024 7:54 PM

भाजपाच्या संघटनात्मक ७८ जिल्ह्यांमध्ये अधिवेशनं आणि विस्तारित कार्यकारिणी बैठका होणार

भाजपाच्या पुण्यात झालेल्या प्रदेश अधिवेशनानंतर आता भाजपाच्या संघटनात्मक ७८ जिल्ह्यांमध्ये २, ३ आणि ४ ऑगस्ट दरम्यान जिल्हा अधिवेशनं आणि विस्तारित कार्यकारिणी बैठका होणार आहेत.   पक्षाच्या मंडल रचनेतल्या सर्व म्हणजे ७७८ मंडलांमध्ये ९, १० आणि ११ ऑगस्ट दरम्यान अधिवेशनं आणि बैठका होतील. भाजपाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.  

July 10, 2024 6:53 PM

खासदार म्हणून निवडून आल्यानंतर भाजपतर्फे राणे यांचा रत्नागिरीत नागरी सत्कार

कोकणातील नैसर्गिक उत्पादनांच्या आधारे इथलं उद्योग वाढवण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याची माझी तयारी आहे. या उद्योगांबरोबरच रिफायनरीसारखे उद्योगही इथं यायला हवेत, असं प्रतिपादन रत्नागिरी-सिंधदुर्गचे  खासदार नारायण राणे यांनी केलं. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर भाजपतर्फे राणे यांचा नागरी सत्कार आज रत्नागिरीत झाला. त्या कार्यक्रमात राणे बोलत होते. रिफायनरीसारखे उद्योग देशात अनेक ठिकाणी आहेत. त्यामुळे काही दुष्परिणाम होत नाहीत, असं सांगतानाच कारखान्यांना विरोध करायला कोणी आलं, तर त्यांच्या विरोधात मी ...