January 16, 2025 3:28 PM

views 38

धुळे जिल्ह्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या हमाल मापाडी कामगारांनी आजपासून सुरू केला बेमुदत संप

धुळे जिल्ह्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या हमाल मापाडी कामगारांनी आजपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मजुरीत वाढ करावी अशी मागणी कामगारांनी केली आहे. जोपर्यंत मजुरी वाढ होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही असा इशारा कामगारांनी दिला आहे.  

January 15, 2025 3:59 PM

views 18

परळीत व्यापाऱ्यांनी वाल्मीक कराडच्या समर्थनार्थ आजपासून पुकारला बेमुदत संप

संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये कटकारस्थान रचण्याच्या आरोपाखाली वाल्मीक कराड याच्यावर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा अर्थात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर बीड जिल्ह्यातल्या परळी शहरात तणावपूर्ण शांतता असल्याचं वृत्त आहे. परळी शहरात पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात केला असून बाजारपेठ बंद आहे. वाल्मिक कराड याला आज केज इथल्या न्यायालयात हजर केलं जाणार असल्यामुळे केज न्यायालय परिसरामध्येही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. दरम्यान, परळीत व्यापाऱ्यांनी वाल्मीक कराडच्या स...