August 19, 2024 8:28 PM August 19, 2024 8:28 PM

views 12

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहायक – लिपिक पदासाठी भर्ती

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहायक - लिपिक पदाच्या १ हजार ८४६ जागांसाठी भर्ती प्रक्रिया राबवली जात आहे. त्यासाठी २० ऑगस्ट, म्हणजे उद्यापासून ९ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरच्या https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn या लिंकवर या भरतीबाबत सविस्तर जाहिरात दिली आहे.

June 21, 2024 8:14 PM June 21, 2024 8:14 PM

views 9

नागरिकांनी नदी, नाल्यांमध्ये कचरा किंवा राडारोडा न टाकण्याचे मुंबई महानगरपालिकेचे आवाहन

बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं नाल्यातला गाळ काढण्याचं काम नियमितपणे केलं जातं. पावसाळापूर्व काळात मुंबई शहरातल्या लहानमोठ्या नाल्यांतला गाळ काढण्यात आला आहे. परंतु, नाल्यांमध्ये आसापासच्या नागरिकांकडून वारंवार कचरा टाकला जात असल्याचं  आढळून येतं. नदी, नाल्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा किंवा राडारोडा टाकला तर  पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होऊन जोरदार पावसाच्या वेळी पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. हे एकप्रकारचं  स्वत:हून ओढवून घेतलेलं संकट आहे. त्यामुळे, नागरिकांनी नदी किं...