June 20, 2025 8:00 PM

views 11

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते बिहारमध्ये ५ हजार ९०० कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण

गेल्या ११ वर्षांत बिहारला समृद्धी आणि विकासाच्या मार्गावर नेणारं राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार हे विकासाचं प्रतीक असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. बिहार इथे सिवानमध्ये एका जाहीर सभेला ते संबोधित करत होते. त्यांनी सिवान इथून ५ हजार ९०० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं दूरस्थ पद्धतीने उद्घाटन आणि पायाभरणी केली. यामध्ये विविध नवीन रेल्वे गाड्यांचा शुभारंभ, प्रधानमंत्री घरकूल योजना, नमामी गंगे योजनेअंतर्गत ६ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचं उद्घाटन इत्यादी विकासकामांचा सम...

June 20, 2025 9:12 AM

views 25

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बिहारमधल्या 5 हजार 9 शे कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बिहार राज्याच्या दौऱ्यावर असून, ते या दौऱ्यात 5 हजार 9 शे कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. यामध्ये विविध नवीन रेल्वे गाड्यांचा शुभारंभ, प्रधानमंत्री घरकुल योजना, नमामी गंगे योजनेअंतर्गत 6 मैला शुद्धीकरण प्रकल्पांच उद्घाटन आदि विकासकामांचा समावेश आहे. प्रधानमंत्री आज दुपारी बिहार मधल्या सिवन जिल्ह्यातल्या जसाउली इथं जाहीर सभा घेणार असून त्यानंतर दूरस्थ पद्धतीने त्यांच्या हस्ते विकास कामांचं उद्घाटन आणि कोनशीला समारंभ होणार आहे. प्रध...

November 13, 2024 3:41 PM

views 20

बिहारमध्ये १२ हजार कोटींच्या विकासकामांची प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी आणि लोकार्पण

सरकार जनतेच्या सेवेसाठी समर्पित असून याच उद्देशानं सुरू केलेल्या आयुष्मान भारत योजनेमुळे जनतेच्या सुमारे सव्वा लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. बिहारमधल्या दरभंगा शहरात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज १२ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण झालं, त्यावेळी ते बोलत होते. प्रधानमंत्र्यांनी या कार्यक्रमात, सुमारे १२ अब्ज ६० कोटी रुपये खर्चून दरभंगा इथं बांधण्यात येणाऱ्या एम्सची पायाभरणी केली. तसंच विविध राष्ट्रीय महामा...

November 6, 2024 11:07 AM

views 20

छटपूजा उत्सवाचा आज दुसरा दिवस, बिहारमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था

छटपूजा उत्सवाचा आज दुसरा दिवस असून त्यासाठी बिहारमध्ये सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे. आज खरना विधी होणार आहे. सूर्य आणि छटी मैय्या यांची पूजा केल्यानंतर भाविक खीर आणि रोटी यांचं सेवन करतील आणि खरनानंतर 36 तास उपवास पाळला जाईल. विविध घाटांवर भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. नद्यांच्या किनाऱ्यांवर राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि राज्य आपत्ती निवारण दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

October 18, 2024 9:02 PM

views 26

आसाम आणि बिहारमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी

आसाम आणि बिहारमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुकीची अधिसूचना आज जारी करण्यात आली. आसामध्ये विधानसभेच्या पाच जागांसाठी आणि बिहारमध्ये विधानसभेच्या चार जागांसाठी पोटनिवडणुक होत आहे. अधिसूचना जारी झाल्यानंतर आज नामांकन प्रक्रिया सुरू झाली आहे. बिहारमध्ये इमामगंज, बेलागंज, रामगढ आणि तरारी या चार विधानसभा मतदारसंघात १३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. २५ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून, ३० ऑक्टोबरला अर्जांची छाननी होणार आहे. मतमोजणी २३ नोव्हेंबरला होणार आहे.

August 27, 2024 8:29 PM

views 43

 बिहारमधून उपेंद्र कुशवाह आणि मनन कुमार मिश्रा यांची बिनविरोध निवड

 बिहारमधून, माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह आणि भाजपा उमेदवार मनन कुमार मिश्रा यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. या दोन जागांच्या पोटनिवडणुकीसाठी कुशवाह आणि मिश्रा या दोघांचेचं उमेदवारी अर्ज आले होते. आज उमेदवारी अर्ज मागं घेण्याचा शेवटचा दिवस होता. दोघांनीही अर्ज कायम ठेवल्यानं निकाल जाहीर करण्यात आला. कुशवाह हे राष्ट्रीय लोकमोर्चाचे अध्यक्ष असून, त्यांचा पक्ष भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी आहे.

August 27, 2024 8:17 PM

views 29

दक्षिण गुजरात, सौराष्ट्र, आणि कच्छमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

दक्षिण गुजरात, सौराष्ट्र, आणि कच्छमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तर गुजरात आणि दक्षिण राजस्थानत आज काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारमध्ये  काही ठिकाणी उद्यापर्यंत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान, येत्या ३० तारखेपर्यंत गुजरात, आणि महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीजवळ समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असल्यानं मच्छिमारांना समुद्राच्या न जाण्यचा सल्ला हवामान वि...

July 29, 2024 3:53 PM

views 18

बिहारमधल्या जाती आधारित आरक्षण रद्द करण्याच्या पाटणा उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

बिहारमधल्या नोकऱ्या आणि महाविद्यालयीन प्रवेशासाठीचं जाती आधारित ६५ टक्के आरक्षण रद्द करण्याच्या पाटणा उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. या प्रकरणात बिहार सरकारनं दाखल केलेल्या अपिलावर न्यायालयानं नोटीस बजावली असून यावर सप्टेंबर महिन्यात सुनावणी घेण्याचं मान्य केलं आहे.  मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि जमातीसाठी बिहारमधल्या नोकऱ्या आणि उच्च शिक्षण संस्थांमधलं आरक्षण ५० टक्क्यांवरून ६५ टक्क्यांपर्यंत वाढवणारी राज्य सरकारची अधिसूचना पाटणा उच्च न्यायालयानं...

July 25, 2024 11:22 AM

views 3

प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणं आणि सरकारी स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी बिहार विधानसभेत विधेयक मंजूर

बिहार राज्य विधानसभेनं प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणं, परीक्षांमधील गैरप्रकार आणि सरकारी स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता रोखण्यासाठी काल एक कठोर विधेयक मंजूर केलं. बिहार सार्वजनिक परीक्षा – गैरमार्ग प्रतिबंध विधेयक 2024 नुसार आता गंभीर प्रकरणांमध्ये 3 वर्षांवरून 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. जलसंपदा मंत्री विजय कुमार चौधरी यांनी हे विधेयक सादर केलं.