August 27, 2024 8:44 AM August 27, 2024 8:44 AM

views 6

राज्यभरातल्या बाजार समित्यांचा एकदिवसीय बंद मागे

महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीनं उद्या पुकारलेला एकदिवसीय बंद मागे घेण्यात आला आहे. मुंबई सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या अध्यक्षतेखाली व्यापारी प्रतिनिधींची बैठक झाली. व्यापाऱ्यांच्या समस्यांबाबत एक उच्चस्तरीय समिती स्थापन करून एका महिन्यात या समितीचा अहवाल घेण्याच्या आश्वासनानंतर हा बंद मागे घेण्याचा निर्णय समितीनं घेतला.