November 6, 2024 11:12 AM November 6, 2024 11:12 AM

views 11

बांदिपोरामध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार

बांदिपोरामध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. उत्तर काश्मीरमधील बंदिपोराच्या जंगलात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर काल रात्री लष्कर, जम्मू-काश्मीर पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांनी संयुक्त मोहिम सुरू केली. लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्यानंतर जवानांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. अजूनही चकमक सुरू आहे.