July 21, 2024 10:30 AM

views 17

बांग्लादेशातल्या हिंसाचाराच्या पार्श्वभुमीवर, एक हजार भारतीय विद्यार्थी सुरक्षित मायदेशी परत

बांग्लादेशात आरक्षणाविरोधात सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभुमीवर, तिथले अंदाजे एक हजार भारतीय विद्यार्थी काल मायदेशी परतले. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, 778 विद्यार्थी जलमार्गानं तर दोनशे विद्यार्थी ढाका आणि चितगाँग विमानतळावरून सुटणाऱ्या नियमित विमानसेवेद्वारे मायदेशी परतले. मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, ढाकातील भारतीय उच्चायुक्तालय तसंच चितगाँग, राजशाही, सिलहेट आणि खुलना इथल्या सहायक उच्चायुक्तांनी भारतीय नागरिकांना मायदेशी परतण्यात सहाय्य केलं. या नागरिका...