December 5, 2024 2:17 PM December 5, 2024 2:17 PM

views 21

बांगलादेशच्या माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांची बांगलादेशातील अंतरीम सरकारवर टीका

बांगलादेशात अल्पसंख्याक समुदायावर सुरु असलेल्या हल्ल्यांच्या विरोधात बांगलादेशच्या माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांनी बांगलादेशातील अंतरीम सरकारवर टीका केली आहे. न्यूयॉर्क मधल्या एका क्रार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीनं दिलेल्या संदेशात त्यांनी म्हटल आहे की, मुहम्मद युनूस अल्पसंख्याकांच्या आणि हिंदूंच्या हिताचं रक्षण करण्यात अपयशी ठरले आहेत. बांगला देश सोडायला लागल्यानंतर शेख हसीना पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.  

July 25, 2024 12:38 PM July 25, 2024 12:38 PM

views 8

महिला क्रिकेटमधे आशिया चषक टी-२० स्पर्धेत उद्या भारतीय संघाचा सामना बांगलादेशसह होणार

महिला क्रिकेटमधे आशिया चषक टी-२० स्पर्धेत उद्या भारतीय संघाचा सामना बांगलादेशसह होणार आहे. दरम्यान, काल या स्पर्धेत झालेल्या श्रीलंका विरुद्ध थायलंड सामन्यात श्रीलंकेच्या संघाचा विजय झाला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या थायलंडनं वीस षटकांत सात गडी गमावून ९३ धावा केल्या. हे लक्ष्य श्रीलंकेच्या संघाने अवघ्या ११ षटकांत पार करत थायलंडवर विजय मिळवला. उद्या श्रीलंकेचा सामना पाकिस्तानसोबत होईल. श्रीलंकेच्या दांबुला इथं हे दोन्ही सामने खेळवले जातील. 

July 16, 2024 8:04 PM July 16, 2024 8:04 PM

views 13

बांगलादेशात कोटा सुधारणेविरोधात झालेल्या निदर्शनांत ३ जणांचा मृत्यू, शंभरहून अधिक जखमी

बांगलादेशात ढाक्यासह विविध शहरांमध्ये आज कोटा सुधारणा आंदोलनाविरोधात झालेल्या निदर्शनांत तीन जण ठार तर शंभरहून अधिक जण जखमी झाले. चट्टोग्राममध्ये कोटा सुधारणा आंदोलक आणि बांगलादेश छात्र लीग आणि जुबो लीगच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या संघर्षात दोन जण ठार झाले. तसंच रंगपूर विद्यापीठाच्या आवारात पोलिस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या चकमकीत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. चट्टोग्राम, रंगपूर, राजशाही आणि बांगलादेशातल्या इतर शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी विविध महामार्गांसह रस्ते रोखल्यानं ढाक्यामधली वाहतूक आ...

June 23, 2024 2:55 PM June 23, 2024 2:55 PM

views 33

20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बांग्लादेशवर मात

टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर ५० धावांनी विजय टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल रात्री झालेल्या सामन्यात भारतानं बांगलादेशचा ५० धावांनी सहज पराभव केला. अँटीग्वा इथल्या सर व्हिव्हियन रिचर्ड्स मैदानावर झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित २० षटकांमध्ये पाच गड्यांच्या मोबदल्यात १९६ धावांचं मोठं आव्हान बांगलादेशसमोर ठेवलं. हार्दिक पंड्यानं फक्त २७ चेंडूंमध्ये ५० धावा फटकावल्या, तर ऋषभ पंतनं २८ चेंडूंमध्ये ३७ धावा केल्या. १९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करता...

June 18, 2024 3:12 PM June 18, 2024 3:12 PM

views 35

टी २० विश्वचषक स्पर्धेतले सुपर ८ देश निश्चित

टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत सुपर ८ संघ निश्चित झाले आहेत. सुपर ८ च्या पहिल्या गटात भारत, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि अफगाणिस्तान तर दुसऱ्या गटात अमेरिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे. सुपर ८ फेरीतला पहिला सामना उद्या अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेत खेळला जाईल. तर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात २० मे रोजी सामना होणार आहे. दोन्ही गटातल्या प्रत्येकी दोन सर्वोत्तम संघांना उपांत्य फेरीत प्रवेश मिळणार आहे.