October 3, 2024 6:43 PM October 3, 2024 6:43 PM

views 9

बदलापूर घटनेप्रकरणी संबंधित शाळा संस्थेच्या अध्यक्षांना आणि सचिवांना अटक

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी संस्थाचालकांना कल्याणच्या विशेष न्यायालयानं एका गुन्ह्यात जामीन दिला पण दुसऱ्या गुन्ह्यात अटक करण्याचे आदेश दिले. या दुसऱ्या गुन्ह्यासाठी त्यांना उद्या न्यायालयात सादर केलं जाण्याची शक्यता आहे. अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना काल कर्जतमधून अटक झाली होती.   या प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेच्या चकमकीतल्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीला गती देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले. या चौकशीचा अहवाल १८ नोव्हेंबरला सादर करायलाही न्यायालयानं सांगितलं. य...

September 24, 2024 8:10 PM September 24, 2024 8:10 PM

views 7

शाळांमधे लहान मुलांच्या सुरक्षेसाठी केंद्रसरकारनं दिलेल्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

शाळांमधे लहान मुलांच्या सुरक्षेसाठी केंद्रसरकारनं दिलेल्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले. बदलापूर प्रकरणी एका सेवाभावी संस्थेनं दाखल केलेल्या याचिकेवर आज न्यायमूर्ती बी व्ही नागरत्न आणि न्यायमूर्ती  एन कोटीश्वर सिंग यांच्या पीठापुढं सुनावणी झाली. फक्त पाच राज्यांनी केंद्रसरकारच्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी केली असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकीलानं न्यायालयाला सांगितलं. राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगानं राज्यं आणि क...

August 27, 2024 8:40 AM August 27, 2024 8:40 AM

views 7

राज्यभरातल्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी पॅनिक बटण बसवले जाणार

राज्यभरातल्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी पॅनिक बटणं बसवण्याचा उपक्रम राबवला जाणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज मुंबईत बातमीदारांना ही माहिती दिली. शाळांमध्ये तक्रारपेट्या बसवण्याचं काम तातडीनं पूर्ण करणार असून पोलिसांच्या उपस्थितीत या पेट्या उघडण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं काल घेतल्याचं त्यांनी सांगितलं.  दरम्यान, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या आरोपीची रवानगी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

August 24, 2024 7:02 PM August 24, 2024 7:02 PM

views 10

कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन राज्य सरकारच्या राजीनाम्याची आणि राष्ट्रपती राजवट लागू करण्याची विरोधकांची मागणी

  बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी सरकारचा निषेध करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या घटकपक्षांतर्फे राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. या मुद्द्यावर पुकारलेला बंद बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिल्यानंतर आज केवळ निदर्शनं करण्याचा निर्णय मविआने घेतला.     ठाण्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. या घटनांना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जबाबदार असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्...