June 18, 2024 11:23 AM

views 40

बकरी ईदचा सण सर्वत्र भक्तिभावानं साजरा

बकरी ईदचा सण काल सर्वत्र भक्तिभावानं साजरा झाला. पारंपरिक पद्धतीनं नमाज पठणासह इतर कुर्बानी आणि इतर धार्मिक विधी पार पडले. छत्रपती संभाजीनगर इथं महापालिकेनं तीन ठिकाणी केलेल्या तात्पुरत्या कत्तलखान्यात काल म्हैस तसंच बकरीवर्गीय सुमारे शंभर जनावरांची कुर्बानी देण्यात आल्याचं, महापालिकेकडून जारी पत्रकात म्हटलं आहे. लातूर शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी बकरी ईद पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. लातूर शहरातल्या ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज पठण करण्यात आलं. त्यानंतर जगभरात शांततेसाठी सामुहिक प्रार्थना क...

June 17, 2024 7:42 PM

views 55

बकरी ईद सण देशभरात उत्साहात साजरा

ईद उल अजहा हा सण देशभरात उत्साहाने साजरा होत आहे.  देशाच्या विविध भागात आज ईदगाह तसंच मशिदीत नमाज अदा करुन एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या.   नागपूर मध्यवर्ती कारागृहातल्या प्रार्थना भवनात जामिया अरेबीय इस्लामीया या संस्थेनं बकरी ईद निमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. बकरी ईदचा नमाज अदा करुन बंदीवानांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.     लातूर शहरातल्या ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज झाली त्यानंतर भारतासह जगभरात शांतता नांदावी म्हणून प्रार्थना झाली. निलंगा इथल्या ईदगाह मैदानावरही सामूहिक नमाज...