August 16, 2025 2:28 PM August 16, 2025 2:28 PM
1
देशभरातल्या दीड हजार टोल नाक्यांवर आजपासून फास्ट टॅगच्या वार्षिक पासची सुविधा मिळणार
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं काल स्वातंत्र्यदिनी देशभरातल्या एक हजार १५० पथकर नाक्यांवर फास्टटॅग वार्षिक पास सुविधा सुरू केली. काल संध्याकाळी सात वाजेपर्यंत १ लाख ४० हजार जणांनी हा पास खरेदी केल्याचं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं सांगितलं. यात महाराष्ट्रातल्या नाशिक-पेठ, सूरत-दहिसर, सातारा-कागल, पुणे-सोलापूर, खंडाळा-सातारा, सांगली-सोलापूर, पाटस-बारामती, नागपूर-कोंढली, नागपूर-हैदराबाद, अमरावती-चिखली, करोडी-छत्रपती संभाजीनगर, मंठा-परतूर, वर्धा-बुट्टीबोरी इत्यादी ९६ मार्गांवरल्या ...