October 18, 2024 6:54 PM October 18, 2024 6:54 PM

views 6

सोलापूर शहर आणि जिल्ह्यातल्या चार विधानसभा मतदारसंघात MIM उमेदवार उभे करणार

सोलापूर शहर आणि जिल्ह्यातल्या चार विधानसभा मतदारसंघात MIM उमेदवार उभे करणार आहे. शहराध्यक्ष फारुक शाब्दी यांनी आज ही घोषणा केली. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून फारुक शाब्दी हेच उमेदवार असतील, अशी घोषणा पक्षाचे अध्यक्ष खासदार असदउद्दीन ओवेसी यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये केली. पक्षानं गेल्या दोन्ही विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती.