June 17, 2024 11:15 AM

views 62

संसदेच्या आवारातील प्रेरणा स्थळाचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते उद्घाटन

संसदेच्या आवारात नव्यानं उभारण्यात आलेल्या प्रेरणा स्थळाचं उद्घाटन काल राज्यसभेचे अध्यक्ष, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते झालं. संसदेला भेट देण्यासाठी आलेल्या अभ्यागतांना स्वातंत्र्य लढ्यातील योद्धे आणि नेते यांचे पुतळे एकाच ठिकाणी पाहता यावेत अशा पद्धतीने या प्रेरणा स्थळाची रचना करण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं या नेत्यांचं जीवन आणि स्वातंत्र्यलढ्यातलं त्यांचं योगदान याविषयीची सविस्तर माहिती पर्यटकांना देण्याची व्यवस्था इथे करण्यात आली आहे.