June 13, 2025 8:42 AM
38
विमान दुर्घटना अन्वेषण विभागाकडून अहमदाबाद विमान दुर्घटनेची चौकशी सुरू
गुजरातमध्ये अहमदाबाद इथं काल दुपारी एअर इंडियाचं एआय-171 हे प्रवासी विमान रहिवासी भागात कोसळलं; विमान दुर्घटना अन्वेषण विभागानं या दुर्घटनेची चौकशी सुरू केली आहे. आंतरराष्ट्रीय नागरी विमान संघटनेनं ठरवलेल्या प्रक्रियेनुसार ही चौकशी केली जाईल, असं नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी सांगितलं. या विमानात प्रवासी आणि कर्मचारी मिळून 242 जण होते. त्यामध्ये 169 भारतीय नागरिक, 53 ब्रिटिश नागरिक, पोर्तुगालचे 7 नागरिक आणि कॅनडाच्या एका नागरिकाचा समावेश होता. या अपघातात विमानंतल्या 241 लोकांचा ...