August 15, 2024 7:00 PM August 15, 2024 7:00 PM

views 9

समान नागरी कायद्यावर देशात व्यापक चर्चेची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून व्यक्त

देशातले १४० कोटी नागरिक एकजुटीने वागले तर, प्रत्येक आव्हानावर मात करत २०४७ पर्यंत विकसित राष्ट्राचं स्वप्न साकार होऊ शकेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त सलग ११व्यांदा मोदी यांनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला, त्यानंतर ते देशाला संबोधित करत होते. विकसित भारतात सर्वसामान्यांच्या जगण्यात सरकारचा कमीत कमी हस्तक्षेप असावा, आणि लोकांना गरज असेल तेव्हाच सरकारने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.   समान नागरी कायद्याची आवश्यकता असल्याचं मत सर्व...