June 18, 2024 7:27 PM

views 16

देशातील शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी शासन कटीबद्ध – मंत्री रक्षा खडसे

शेतकरी हा देशाचा कणा आहे, देशातील शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी आणि भविष्यातही शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी शासन कटीबद्ध असेल, असं प्रतिपादन केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आज हिंगोली इथं केलं. हिंगोली जिल्ह्यात  तोंडापूर इथल्या कृषी विज्ञान केंद्रात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

June 18, 2024 7:12 PM

views 26

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा १७ वा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा

देशाला जगातली तिसरी अर्थव्यवस्था बनवण्याच्या दृष्टीनं शेतीचा विकास हा अत्यंत महत्त्वाचा असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याला आपण प्राधान्य दिल पाहिजे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी मधल्या मेहेंदीगंज इथं  केलं. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा १७ वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या बँक  खात्यात प्रधानमंत्र्यांनी जमा केला, यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या उपक्रमांतर्गत २० हजार कोटींहून अधिक रुपये ९ कोटी २६ लाख लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.  ३० हजा...