August 10, 2024 9:55 AM August 10, 2024 9:55 AM
8
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरी भागासाठीच्या दुसऱ्या योजनेला आणि स्वच्छ वनस्पती योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
केंद्रीय मंत्रिमंडळानं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरी भागासाठीच्या दुसऱ्या योजनेला तसंच ग्रामीण भागात 2024-25 ते 2028-29 या आर्थिक वर्षातील अंमलबजावणीलाही मान्यता दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत माध्यमांना ही दिली. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तीन कोटी नवी घरं बांधण्यात येणार असून, त्यापैकी दोन कोटी घरं ग्रामीण भागात बांधली जातील, तर एक कोटी घरं शहरी भागात बांधली जातील. या योजनेसाठी तीन लाख साठ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे, असंही त्यांनी ...