June 18, 2024 7:04 PM June 18, 2024 7:04 PM

views 16

यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम श्रीनगरमध्ये

यंदाच्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचा मुख्य कार्यक्रम श्रीनगरमध्ये शेर-ए-कश्मिर आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे. सर्वसामान्य नागरिकांसह प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यात सहभागी होतील, अशी माहिती आयुष खात्याचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली. योगासनांवर आधारित प्रोफेसर आयुष्मान योग विशेष या कॉमिक पुस्तकाचं अनावरणही त्यांनी आज केलं.यामुळं लहान मुलांना योगासनांमध्ये अधिक रुची निर्माण व्हायला मदत होईल. कॉमन योग प्रोटोकॉलच्या पुस्तकाच्या ब्रेल आवृत्तीचंही अनावर...