November 11, 2024 2:32 PM November 11, 2024 2:32 PM
4
राज्यात विधानसभा निवडणुकीचा दिवस जवळ येत असल्याने, सर्वच उमेदवारांनी वाढवला प्रचाराचा वेग
राज्यात विधानसभा निवडणुकीचा दिवस जवळ येत असल्यानं, सर्व प्रमुख पक्षांनी तसंच अपक्ष उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढवला आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी आज नागपुरात ४ प्रचारसभा घेणार आहेत तर उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस नागपूर, गोंदिया आणि मुंबईत प्रचार करणार आहेत. शिवसेनेचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज जालना इथं प्रचारसभा घेणार आहेत. महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकर यांच्या प्रचारासाठी ते आज सभा घेणार आहेत. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अज...