February 3, 2025 1:35 PM February 3, 2025 1:35 PM

views 22

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संध्याकाळी संपणार

दिल्ली विधानसभा निवडणूक तसंच उत्तर प्रदेश आणि तमिळनाडूतल्या पोटनिवडणुकीसाठी एक्झिट पोल म्हणजे मतदानोत्तर चाचणीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. येत्या बुधवारी म्हणजेच मतदानाच्या दिवशी सकाळी ७ पासून संध्याकाळी साडेसहापर्यंत हे बंदी आदेश लागू राहतील. त्याचप्रमाणे मतदानापूर्वी ४८ तास प्रसारमाध्यमांना कोणत्याही प्रकारचे ओपिनियन पोल प्रसिद्ध करता येणार नाहीत. या निवडणुकांसाठी प्रचाराची मुदत आज संध्याकाळी संपत आहे. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी तसंच तमिळनाडू आणि उत्तरप्रदेशातल्या प्रत्येक...

November 13, 2024 1:57 PM November 13, 2024 1:57 PM

views 17

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीचा प्रचार शिगेला, सर्व पक्षीय नेत्यांच्या ठिकठिकाणी सभा

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार जोरात सुरु आहे. सर्व पक्षांचे नेते राज्यभरात आजही ठिकठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा धुळे, जळगाव आणि परभणी इथं सभा घेणार आहेत. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा मुंबई आणि अहिल्यानगरमध्ये प्रचार करणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभा चंद्रपूर आणि नागपुरातल्या विविध मतदारसंघात होणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ वाशिम जिल्ह्यात कारंजा आणि ठाणे जिल्ह्यात उल्हासनगर तसंच मीरा भाईंदर इथं प्रचार ...

November 11, 2024 1:35 PM November 11, 2024 1:35 PM

views 11

झारखंड विधानसभेच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी आज संध्याकाळी प्रचार थांबणार

झारखंड विधानसभेच्या पहिल्या टप्प्यात १३ नोव्हेंबर रोजी ४३ जागांसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी आज संध्याकाळी प्रचार थांबणार आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दुपारी १२ वाजता पक्ष कार्यकर्त्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि इंडिया आघाडी यांनी जोरदार प्रचार केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठीही आज प्रचार थांबणार आहे. युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटकडून काँग्रेस उमेदवार प्रियांका गांधी निवडणूक लढवत आहेत त...

November 10, 2024 1:49 PM November 10, 2024 1:49 PM

views 10

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी प्रचार शिगेला

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी प्रचार शिगेला पोहोचला आहे. एनडीए आणि  इंडिया या दोन्ही आघाड्यांचे नेते आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या बाजूने मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्यभर झंझावाती दौरे करत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बोकारो इथं सभा घेत असून गढवा  इथंही त्यांची प्रचारसभा होणार आहे, तर रांची मधे ते रोड शो करणार आहेत. मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री मोहन यादव तसंच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान प्रत्येकी तीन सभा घेणार आहेत, तर भाज...

November 6, 2024 8:36 AM November 6, 2024 8:36 AM

views 20

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी काल प्रचाराचा नारळ फोडला. तर वंचित बहुजन आघाडीनं काल जाहीरनामा प्रसिद्ध केला. महायुतीतर्फे शिवसेनेचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी कोल्हापूरमध्ये एकत्रित जाहीर सभा घेत प्रचाराचं रणशिंग फुंकलं. राज्यात महिला, शेतकरी, युवा यांच्यासह विविध घटकांसाठी राबवलेल्या कल्याणकारी योजनांचा ...