October 15, 2024 10:04 AM October 15, 2024 10:04 AM

views 15

केंद्रीय गृहमंत्री आज नवी दिल्लीत भारतीय पोलीस सेवेतील प्रशिक्षणार्थीं अधिकाऱ्यांशी साधणार संवाद

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्लीत भारतीय पोलीस सेवेतील प्रशिक्षणार्थीं अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. हे प्रशिक्षणार्थी अधिकारी त्यांचे प्रशिक्षण काळातील अनुभव गृहमंत्र्यांना सांगणार आहेत. तर देशाच्या अंतर्गत सुरक्षेपुढील आव्हानांना कशाप्रकारे तोंड देता येईल याचं अमित शहा त्यांना मार्गदर्शन करतील. भारतीय पोलीस सेवेच्या 2023 च्या तुकडीत 54 महिला अधिकाऱ्यांसह एकंदर 188 अधिकाऱ्यांचा समावेश आहे.  

June 18, 2024 6:48 PM June 18, 2024 6:48 PM

views 8

राज्य पोलीस दलातल्या १७ हजारांहून अधिक पदांसाठी उद्यापासून मैदानी चाचणी

राज्य पोलीस दलातल्या १७ हजारांहून अधिक पदांसाठी उद्यापासून मैदानी चाचणी सुरू होणार आहे. यात पोलीस शिपाई, चालक, बँडवादक, तुरुंग विभाग शिपाई अशा पदांचा समावेश आहे. यात उमेदवारांना एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करण्याची मुभा आहे. या परिस्थितीत मैदानी चाचणी एकाच दिवशी असेल तर उमेदवारांना ४ दिवसांच्या अंतरानं वेगवेगळ्या तारखा द्याव्या अशा सूचना प्रशिक्षण विभागाच्या अप्पर पोलिस महासंचालकांनी दिल्या आहेत.